SHREYAS IYER-UMPIRE CONTROVERSY, WIDE DECISION CHANGED
esakal
India vs Japan cricket wide decision controversy: भारतीय संघाला पावसाने बाधित झालेल्या जपानविरुद्धच्या सामन्यात विजयासाठी घाम गाळावा लागला. जपान आणि भारत यांच्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळला गेला. जपानच्या प्रेक्षकांना क्रिकेटची फार जाण नसली तरी हा सामना पाहण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी जमली होती. जपानच्या संघाने उपस्थित चाहत्यांना निराश केले नाही. यजमान जपानने जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला ५-५ षटकांच्या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत विजयासाठी संघर्ष करायला लावला. पण, या सामन्यातील शेवटच्या षटकात वादग्रस्त निकालामुळे सामन्याला कलाटणी मिळाली.