ishan kishan hardik pandya fifty
esakal
India vs Namibia T20 World Cup Marathi Cricket News : संजू सॅमसनच्या आक्रमक सुरुवातीनंतर इशान किशनने ( Ishan Kishan) चौकार-षटकारांनी मैदान व्यापून टाकले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. पण, त्याच्या विकेटनंतर नामिबियाच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड घेताना भारताच्या धावगतीला लगाम लावला होता. इशान व तिलक वर्मा यांनी ३१ चेंडूंत ७९ धावा चोपल्या. या सामन्यात भारताने पॉवर प्लेमधील सर्वाधिक धावा, सर्वात वेगवान सांघिक शतक असे विक्रम नावावर केले. हार्दिक पांड्या व शिवम दुबे यांनी भारताला मोठी मजल मारून दिली. भारत ३००पर्यंत पोहोचेल असे वाटत होते, परंतु नामिबियाच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला अन् भारताला २१० च्या आत रोखले.