IND vs NZ 1st Test Live: गौतम गंभीर-शुभमन गिलचे डावपेच भारतीय संघावर उलटले; ७० धावांवर ५ विकेट्स मिळवूनही रडले... पहिल्या दिवशी नेमके काय चुकले?

Gautam Gambhir and Shubman Gill selection mistake in Wellington Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी गौतम गंभीर आणि शुभमन गिल यांच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह मैदानावर भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला अक्षरशः धुमाकूळ घातला, पण...
Gautam Gambhir and Shubman Gill selection mistake in Wellington Test

IND vs NZ: 5 Wickets For Just 70 Runs, Then What Went Wrong For India? Nicholls And Phillips Turn The Tables

esakal

Updated on: 

Henry Nicholls and Glenn Phillips partnership against India: प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात अप्रतिम इनस्विंगवर कर्णधार टॉम लॅथमचा त्रिफळा उडवला अन् टीम इंडियाला अपेक्षित सुरूवात मिळवून दिली. त्यानंतर अंशुल कंबोज, आकाश दीप यांनीही अचूक टप्प्यावर न्यूझीलंडला धक्के दिले.. जस्सी सापळा रचून किवींच्या एकेका फलंदाजाला तंबूची वाट दाखवत होता आणि त्यामुळे यजमानांची अवस्था ५ बाद ७० धावा अशी दयनीय झालेली. पहिल्या सत्रातील यशानंतर भारत लवकरच किवींना गुंडाळेल असे वाटले होते, परंतु त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताला एकही विकेट मिळवता आली नाही. ग्लेन फिलिप्स व हेन्री निकोल्स ही जोडी मैदानावर उभी राहिली.

Loading content, please wait...