IND vs NZ 1st Test: १५ षटकं शिल्लक असताना 'ड्रॉ' निकाल मान्य का केला? गौतम गंभीरने नेमकं काय सांगितलं? शुभमन गिलने मॅचनंतर सर्व सांगितलं, म्हणाला...

Why did India agree to a draw with 15 overs remaining against New Zealand? भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर टीम इंडियाच्या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.भारताने विजयाची संधी असताना माघार का घेतली? यावर कर्णधार शुभमन गिलने महत्त्वाचा खुलासा केला आहे.
Shubman Gill reveals reason behind early declaration of draw 1st Test vs NZ

IND vs NZ 1st Test Shubman Gill Breaks Silence On India Early Handshake Against New Zealand, Reveals Reveals What Gautam Gambhir Told Him

esakal

Updated on: 

Why Did India Agree To A Draw With 15 Overs Remaining? भारतीय संघ वेलिंग्टन कसोटीत विजयाच्या उंबरठ्यावर दिसत होता, परंतु न्यूझीलंडने चिवट खेळ करून सामना ड्रॉ राखला. या निकालामुळे भारताच्या WTC गुणतालिके १.१५ टक्क्यांची घसरण झाली आणि ते ५० टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर राहिले आहे. न्यूझीलंडलाही मोठा धक्का बसला आणि त्यांची टक्केवारी ७२.२२ वरून ६६.६७ अशी झाली आहे आणि ते तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. पाचव्या दिवसातील १५ षटकं शिल्लक असताना कर्णधार शुभमन गिलने ( Shubman Gill) ड्रॉ निकाल का मान्य केला, हा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे.

Loading content, please wait...