IND vs NZ 2nd ODI Live : शुभमन गिल, हे काय केलंस... लोकेश राहुलसह सर्वच अचंबित; डॅरिल मिचेल तंबूच्या दिशेने निघालाच होता, पण.. Video Viral

Shubman Gill drops Daryl Mitchell catch in 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलकडून मोठी चूक झाली
India vs New Zealand ODI Series

Shubman Gill drops a straightforward catch of Daryl Mitchell

esakal

Updated on: 

New Zealand vs India, 2nd ODI Marathi Live Update : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलकडून मोठी चूक झाली. अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर डॅरिल मिचेलने चेंडू मिड-ऑफच्या दिशेने उंच मारला. हा झेल टिपण्यासाठी गिलकडे पुरेसा वेळ होता. त्याने दोन्ही हातांनी चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र अगदी सोपा वाटणारा झेल त्याच्या हातातून निसटला. विशेष म्हणजे, चेंडू बॅटला लागताच मिचेलला आपण बाद झाल्याची खात्री वाटली होती. तो माघारी फिरूही लागला होता. मात्र गिलने झेल सोडल्याने त्याला मोठे जीवदान मिळाले. यावेळी यष्टीरक्षक लोकेश राहुलसह भारतीय खेळाडूही आश्चर्यचकित झाले.

Loading content, please wait...