Ishan Kishan smashed a breathtaking century in the IND vs NZ 2nd T20I
esakal
Cricket
IND vs NZ 2nd T20I: इशान किशनचं वादळ... ११ चौकार अन् ४ षटकार! सूर्या दादासोबत १२२ धावांची भागीदारी अन्...
India vs New Zealand 2nd T20I Marathi Live: इशान किशनने पुन्हा एकदा आपली आक्रमक शैली दाखवत मैदानावर वादळ निर्माण केलं. ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने त्याने किवी गोलंदाजांचा अक्षरशः समाचार घेतला. शतक जवळ असताना इशान बाद झाला आणि त्याचं शतक थोडक्यात हुकलं.
India vs New Zealand 2nd T20I Marathi Cricket Update: संजू सॅमसन व अभिषेक शर्मा हे दोन्ही सलामीवीर ७ चेंडूंत माघारी परतल्यानंतर इशान किशनचे ( Ishan Kishan) वादळ घोंगावले. कर्णधार सूर्यकुमार यादवसह त्याने ४३ चेंडूंत शतकी भागीदारी करून सामन्याचा निकाल ठरवून टाकला.
