IND vs NZ 2nd T20I : अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर! दोन बदलांसह भारत मैदानावर उतरला, टॉस जिंकला

India vs New Zealand 2nd T20I Marathi Live: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉसनंतर बोलताना सूर्यकुमार म्हणाला, “आम्हाला लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि खेळाडूंनाही त्याचा सराव व्हायला हवा. त्यामुळे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.”
India vs New Zealand 2nd T20I Marathi Live

India vs New Zealand 2nd T20I Marathi Live

esakal

Updated on

India vs New Zealand 2nd T20I Marathi Cricket Update: भारत-न्यूझीलंड यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना रायपूर येथे खेळला जातोय. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मालिकेत विजयी सलामी दिली. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवून भारताने १-० अशी आघाडी घेतली. पण, न्यूझीलंडचा संघ सहजासहजी हार मानणारा नाही आणि त्यांच्याकडून आज प्रत्युत्तराची अपेक्षा आहे. त्यात भारताला पहिल्या सामन्यात झटका बसला, जेव्हा अक्षर पटेल ( Axar Patel) याने दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com