Dhruv Jurel fighting fifty against New Zealand in second Test
esakal
India vs New Zealand 2nd Test Day 3 Marathi Cricket News: ध्रुव जुरेलने पुन्हा एकदा त्याचे महत्त्व दाखवून दिले. अडचणीत सापडलेल्या भारतीय संघावर फॉलो ऑनचे संकट असताना ध्रुव मैदानावर ( Dhruv Jurel) शड्डू ठोकून उभा राहिला. न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच षटकात भारताला सातवा धक्का दिला आणि त्यानंतर फॉलो ऑन देण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण, यष्टिरक्षक-फलंदाजाने तळाच्या गोलंदाजांना सोबतीला घेतले आणि संघावरील फॉलो ऑनचे संकट दूर केले. त्याने आठव्या व नवव्या विकेटसाठी अनुक्रमे आकाश दीपसह ४६ व गुरनूर ब्रारसोबत ६४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.