IND vs NZ 2nd Test Live: स्टम्प उडतोय, स्पष्ट दिसतंय... तरीही टॉम लॅथमला अम्पायरने वाचवले; जसप्रीत बुमराहने पाचव्या चेंडूवर दिलेला धक्का, मग काय घडलं?

Jasprit Bumrah denied wicket in first over against New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला अडचणीत आणले. पण, एका नियमामुळे तो वाचला...
India vs New Zealand 2nd Test

Tom Latham survives Bumrah LBW appeal after DRS review | IND vs NZ 2nd Test

esakal

Updated on: 

New Zealand vs India, 2nd Test Marathi Live Score : जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला हलकासा हृदयविकाराचा झटका दिला होता. जसप्रीतच्या अप्रतिम चेंडूवर लॅथम पायचीत झाला आणि मैदानावरील अम्पायरनेही OUT असा सिग्नल दिला. पण, त्यानंतर DRS चा खेळ झाला आणि त्यातही चेंडू यष्टींवर आदळत असल्याचे स्पष्ट दिसत होते. असे असूनही लॅथमला नाबाद दिले गेले आणि भारतीय चाहत्यांचे चेहरे पडले.

Loading content, please wait...