Jasprit Bumrah dance celebration video against New Zealand
esakal
India vs New Zealand 2nd Test Day 3 Marathi Cricket News: जसप्रीत बुमराहने अखेर कसोटी क्रिकेटमध्ये २९२ चेंडूंतर पहिली विकेट मिळवली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जस्सीने पाच विकेट्स घेतल्या, पण दुसऱ्या डावातील पहिल्या षटकात टॉम लॅथमच्या विकेटनंतर त्याला पुढील विकेटसाठी दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावाची प्रतीक्षा पाहावी लागली. जवळपास ५० षटकानंतर त्याला ही विकेट मिळाली. क्राइस्टचर्च कसोटीत पहिल्या डावात २६ षटकांत त्याची पाटी कोरी राहिलेली, पण रविवारी त्याने किवींना दोन धक्के दिले. विकेट मिळाल्याचा आनंद जस्सी लपवू शकला नाही आणि तो चक्क नाचताना दिसला.