IND vs NZ 2nd Test Live: KL Rahul ची चूक महागात पडली; आकाश दीपची मेहनत वाया... पहिल्या सत्रात बरंच काही घडलं, शेवटच्या चेंडूवर विकेट

India vs New Zealand 2nd Test Marathi Cricket News: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. न्यूझीलंडच्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पम, किवींना नशिबाची साथ मिळाली.
India vs New Zealand 2nd Test

KL Rahul drops a crucial catch off Akash Deep's bowling, giving Tom Latham a huge lifeline in the first session of the IND vs NZ 2nd Test.

esakal

Updated on: 

New Zealand vs India, 2nd Test Marathi Live Score : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र यजमानांच्या नावावर राहिले. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात कर्णधार टॉम लॅथमला पायचीत पकडले होते, परंतु तिसऱ्या अम्पयारने त्याला नाबाद ठरवले.. त्यानंतर आकाश दीपने ( Aakash Deep ) अचूक टप्प्यावर मारा करून किवी फलंदाजांना अडचणीत आणले. त्याने लॅथमची विकेटही मिळवून दिली होती, परंतु लोकेश राहुलने ( KL Rahul) चूक केली आणि तिच आता महागात पडताना दिसतेय. अंशुल कंबोजला टार्गेट केले गेले, तर पदार्पणवीर गुरनूर ब्रार ( Gurnoor Brar) फार उशीरा गोलंदाजीला आणल्याने चर्चा रंगली. मोहम्मद सिराजला पुन्हा वगळल्याने हर्षा भोगले, सुनील गावस्कर, मोहम्मद कैफ यांनी आश्चर्य व्यक्त केले.

Loading content, please wait...