IND vs NZ, 3rd ODI: डॅरिल मिशेल-ग्लेन फिलिप्सचा शतकी दणका! भारतासमोर 'करो वा मरो' सामन्यात न्यूझीलंडने ठेवलं मोठं लक्ष्य

India vs New Zealand, 3rd ODI, 1st Innings: भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी शतके केली आहेत. त्यामुळे न्यूझीलंडने ३०० धावांचा टप्पा सहज पार करत भारतासमोर मोठे लक्ष्य ठेवले आहे.
Daryl Mitchell & Glenn Phillips | India vs New Zealand 3rd ODI

Daryl Mitchell & Glenn Phillips | India vs New Zealand 3rd ODI

Sakal

Updated on

India need runs to win 3rd ODI vs NZ: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वनडे मालिकेतील निर्णायक तिसरा सामना खेळवला जात आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर ३०० धावांचा टप्पा पार करत मोठे लक्ष्य ठेवण्यात यश मिळवले आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) आणि ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) यांनी शतके केली आहेत. त्यामुळे न्यूझीलंडने भारताला ३३८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

<div class="paragraphs"><p>Daryl Mitchell &amp; Glenn Phillips | India vs New Zealand 3rd ODI</p></div>
IND vs NZ 3rd ODI: डॅरिल मिशेल टीम इंडियासाठी ठरतोय डोकेदुखी, सलग दुसरं शतक झळकावत घडवला इतिहास
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com