Axar Patel misses run-out chance against Finn Allen in 3rd T20I
esakal
India vs New Zealand 3rd T20I Marathi Cricket News: भारत-न्यूझीलंड तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. अर्शदीप सिंगने दुसऱ्याच षटकात न्यूझीलंडचा सलामीवीर टीम सेइफर्टला माघारी पाठवले. पण, त्याच षटकात असं काही घडलं की सारे अचंबित झाले. अर्शदीप डोक्यावर हात लावून मैदानावर बसला, तर अक्षर पटेलने ( Axar Patel) चेहरा लपवला. भारतीय खेळाडू बापूचे सांत्वन करायला गेले. या एका प्रसंगाने सामन्याचे चित्र मात्र बदलून गेले...