India registered their ninth consecutive T20I series win

India registered their ninth consecutive T20I series win

IND vs NZ 3rd T20I : भारताने जिंकली सलग नववी ट्वेंटी-२० मालिका! अभिषेक, सूर्यकुमारच्या वादळासमोर न्यूझीलंडचा पालापाचोळा

India vs New Zealand 3rd T20I Marathi News : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवत सलग नववी ट्वेंटी- २० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.
Published on

India vs New Zealand 3rd T20I Marathi Cricket Update: भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनतंर भारतीय फलंदाजांनी मैदान गाजवले. पहिल्या चेंडूवर संजू सॅमसन बाद झाला, परंतु अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma), इशान किशन व सूर्यकुमार यादव गरजले आणि भारताने सामना सहज जिंकला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com