IND vs NZ 3rd T20I match time and live streaming details
esakal
Where to watch India vs New Zealand 3rd T20I for free: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा ट्वेंटी-२० सामना आज वेलिंग्टनमध्ये खेळला जाईल. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. आजही विजय मिळवून भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाने वेलिंग्टनमध्ये एकूण चार ट्वेंटी-२० सामने खेळले असून, त्यापैकी दोन जिंकले, एक गमावला आणि एक सामना अनिर्णित राहिला. या मैदानावर भारताचा शेवटचा ट्वेंटी-२० सामना २०२२ मध्ये झाला होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. २०२० मध्ये याच मैदानावर दोन्ही संघांमधील ट्वेंटी-२० सामना खूपच रोमांचक ठरला होता, ज्यात भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता.