IND vs NZ 4th ODI Live: सोपा झेल टाकल्यावर टीका, ३९ वर्षीय रोहित शर्माने सुपर डाईव्ह मारून केली बोलती बंद Video Viral

Rohit Sharma's Super Diving Catch Stuns Fans: आधी दोन झेल सोडल्यानंतर ३९ वर्षीय रोहित शर्माने फिन अ‍ॅलनचा अफलातून सुपर डायव्ह मारून झेल टिपला. रोहितच्या या शानदार क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ व्हायरल!
Rohit Sharma stunning diving catch against New Zealand

Rohit Sharma stunning diving catch against New Zealand

esakal

Updated on: 

39-year-old Rohit Sharma takes unbelievable catch in 4th ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या वन डे सामन्यात रोहित शर्माने आपल्या अफलातून क्षेत्ररक्षणाने चाहत्यांची मने जिंकली. या सामन्यात सुरुवातीला रोहित शर्माकडून विल यंगचा सोपा झेल सुटला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर यष्टीरक्षक ईशान किशनलाही झेल पकडण्यात अपयश आले. सलग दोन चेंडूंवर मिळालेल्या या जीवदानांमुळे गोलंदाज आकिब नबी चांगलाच निराश झाला होता. पण, रोहितने नंतरच्या टप्प्यात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर अफलातून झेल घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

Loading content, please wait...