India vs New Zealand 4th ODI Playing XI
India vs New Zealand 4th ODI Marathi Cricket News : भारतीय संघाने नाणेफेक जिंकण्याची परंपरा कायम राखताना प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शुभमन गिल, लोकेश राहुल व अंशुल कंबोज हे कसोटी मालिकेच्या तयारीसाठी निघून गेल्याने श्रेयस अय्यर वन डे संघाचे नेतृत्व करतोय. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार हे निश्चित होते, त्यानुसार ऋतुराज गायकवाड, इशान किशन व कुलदीप यादव या तीन बदलांसह भारत मैदानावर उतरला. पण, रोहित शर्मासह सलामीला कोण येईल, याची उत्सुकता आहेच.