IND vs NZ, 4th ODI: भारताचा लाजिरवाणा पराभव! विराट, रोहित, श्रेयस, ऋतुराज...सर्वच फेल, न्यूझीलंडने १०० धावाही करू दिल्या नाहीत

भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या वनडेत निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताचे सर्वच प्रमुख फलंदाज या सामन्यात अपयशी ठरले. भारतीय संघ १०० धावाही या सामन्यात करू शकला नाही.
Matt Henry | India vs New Zealand 4th ODI

Matt Henry | India vs New Zealand 4th ODI

Sakal

Updated on: 

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात चौथा वनडे सामना माऊंट मौंगानुई येथे शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यात भारताकडून अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली. भारताला या सामन्यात तब्बल २४४ धावांनी पराभवाचा फटका बसला आहे. न्यूझीलंडने पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर चौथा सामना जिंकत मालिकेत दमदार पुनरागमन केले आहे. पण पहिल्या दोन सामन्यातील विजयांमुळे भारतीय संघ मालिकेत २-१ असा आघाडीवर आहे.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर ३३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला २६.४ षटकात ८९ धावाच करता आल्या. भारताच्या फक्त तीन फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या गाठता आली.

(बातमी अपडेट होत आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...