IND vs NZ 4th ODI: ऋतुराज गायकवाड-रोहित शर्मा सलामीला, इशान पाचव्या स्थानावर; सामना संपताच वेगवान गोलंदाज वन डे टीम सोडून जाणार, नेमकं काय कारण?

IND vs NZ 4th ODI India probable playing XI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या वन डे सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सलामीवीर शुभमन गिलच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते.
IND vs NZ 4th ODI India probable playing XI

IND vs NZ 4th ODI India probable playing XI

Updated on: 

Rohit Sharma Ruturaj Gaikwad opening partnership: न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वन डे सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल निश्चित आहे. शुभमन गिल, लोकेश राहुल व अंशुल कंबोज हे कसोटी मालिकेच्या तयारीसाठी वेलिंग्टनला गेले आहेत. त्यामुळे ते उर्वरित दोन वन डे सामन्यांसाठी उपलब्ध नाहीत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया हे दोन सामने खेळेल. चौथ्या वन डे सामन्यातील अंतिम अकरामधील बदलासोबतच टीम इंडियात आणखी काही हालचाली घडताना दिसत आहेत. वन डे मालिकेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या गुरनूर ब्रारला ( Gurnoor Brar) कसोटी मालिकेसाठी बोलावणे येऊ शकते. त्यामुळे तो चौथ्या वन डेनंतर वेलिंग्टनला रवाना होऊ शकतो.

Loading content, please wait...