ROHIT SHARMA, ISHAN KISHAN MISS TWO CHANCES IN TWO BALLS, AQUib NABI FURIOUS
esakal
India vs New Zealand 4th ODI Marathi Cricket News : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या वन डे सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. न्यूझीलंडचा फलंदाज विल यंग याला अवघ्या दोन चेंडूंमध्ये दोनदा जीवदान मिळाले. भारतीय संघाकडून झालेल्या या सलग चुकांमुळे गोलंदाज आकिब नबीची निराशा लपून राहिली नाही. पहिल्यांदा रोहित शर्माने स्लिपमध्ये विल यंगचा झेल सोडला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर आकिब नबीच्या गोलंदाजीवर यष्टीमागे इशान किशनला संधी साधता आली नाही.