Champions Trophy 2025 Final IND vs NZ Live : न्यूझीलंडला दुसऱ्या डावाची सुरुवात होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. केन विल्यमसन मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी आलेला नाही आणि त्याच्या जागी मार्क चॅपमन मैदानावर दिसतोय. केन विल्यमसनला आज फलंदाजीत फार कमाल करून दाखवता आली नाही. तो केवळ ११ धावा करून कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ड झाला होता. रोहित शर्माने लक्ष्याचा पाठलाग करताना आक्रमक अर्धशतक झळकावून टीम इंडियाला फ्रंटसिटवर बसवले असताना विल्यमसनचे मैदानावर नसणे किवींची चिंता वाढवणारे आहे.