

India vs New Zealand 1st Test
Sakal
New Zealand vs India 1st Test Playing XI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेला गुरुवारपासून (१९ नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर खेळला जात आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकली (Shubman Gill won toss) असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळपट्टीवर गवत असल्याने सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे.