

IND vs PAK Final
esakal
ASIAN GAMES 2026 FINAL: भारताने पाकिस्तानविरुद्धच्या फायनल सामन्यात २० षटकांत ६ विकेट गमावत २११ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता गोल्ड मेडल जिंकण्यासाठी पाकिस्तानला २१२ धावा कराव्या लागणार आहेत. भारताकडून अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माने चांगली फलंदाजी केली.
भारताकडून डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी केली. वैभवने सुरुवातीपासूनच मोठे फटके मारायला सुरुवात केली. त्याने दोन षटकारही मारले. मात्र, १५ धावांवर तो बाद झाला.