IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

India captain Suryakumar Yadav reaction after beating Pakistan : भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप सामन्यातील दणदणीत विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेले वक्तव्य चाहत्यांची मने जिंकणारे ठरले. पाकिस्तानवर मात करत भारताने Super 8 मध्ये प्रवेश निश्चित केला आणि स्पर्धेतील आपली दावेदारी अधिक भक्कम केली.
Suryakumar Yadav dedicates victory to the nation after dominant win over Pakistan

Suryakumar Yadav dedicates victory to the nation after dominant win over Pakistan

esakal

Updated on

India vs Pakistan post match interview Marathi News : गतविजेत्या भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ मधील आपले स्थान पक्के केले. कोलंबो येथे रविवारी झालेल्या लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करून भारताने आयसीसी स्पर्धेतील आपली दादागिरी पुन्हा दाखवली. भारताने मागील १० आंतरराष्ट्रीय सामन्यांत पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही जय-परायजाच्या आकडेवारी भारत ८-१ असा निर्विवाद आघाडीवर आहे. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) हा विजय भारतीयांना समर्पित केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com