India defeat Pakistan in Colombo to seal Super 8 qualification with a hat-trick of wins
esakal
T20 World Cup India Crush Pakistan, Confirm Super 8 Spot in Style Marathi Update : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साजरी करताना Super 8s मधील आपली जागा पक्की केली. इशान किशनच्या ( Ishan Kishan) दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी त्यांची ताकद दाखवली. भारताने रविवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. IND vs PAK लढतीवर बहिष्काराची भाषा करून नाटक करणाऱ्या पाकिस्तानला पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वीसमोर नमवून सूर्यकुमार यादवच्या संघाने त्यांची पार इभ्रत काढली. आता पाकिस्तानचा सुपर ८ चा मार्ग खडतर झाला आहे. भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील पाकिस्तानविरुद्धची जय-पराजयाची आकडेवारी ८-१ अशी अधिक मजबूत केली.