IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Ishan Kishan reaction after India beat Pakistan Marathi News: भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप सामन्यातील दणदणीत विजयानंतर Ishan Kishan याने संघाच्या आत्मविश्वासाबद्दल मोठे वक्तव्य केले. पाकिस्तानवर मात करत भारताने Super 8 मध्ये प्रवेश निश्चित केला आणि स्पर्धेतील विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली.
ISHAN KISHAN REACTION AFTER INDIA BEAT PAKISTAN

ISHAN KISHAN REACTION AFTER INDIA BEAT PAKISTAN

esakal

Updated on

T20 World Cup Ishan Kishan post match interview vs Pakistan : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची विजयाची परंपरा कायम राखली. कोलंबोत १२ वर्षांनी उभय संघ समोरासमोर आले होते, परंतु निकाल तोच लागला. भारताच्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ ११४ धावांत तंबूत परतला. पहिली विकेट घेणाऱ्या हार्दिक पांड्याने शेवटच्या फलंदाजाला माघारी पाठवले. ७७ धावांची खेळी करणाऱ्या इशान किशनला ( Ishan Kishan) प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला गेला. पुरस्कार स्वीकारताना त्याने पाकिस्तानला ट्रोल केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com