Aaryavir Sehwag scores 58 against Pakistan in U19 Asia Cup final
Virender Sehwag's son Aaryavir Sehwag batting against Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये आर्यवीर सेहवागने आपल्या फलंदाजीने लक्ष वेधून घेतले. भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा असलेल्या आर्यवीरने ३३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. कर्णधार लक्ष्य रायचंदानीसोबत त्याने पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताच्या डावाला चांगला पाया मिळाला.