Black Clouds Over India-Pakistan Match as Sri Lanka Issues Weather Warning
esakal
Colombo weather forecast February 15 cricket match: पाकिस्तानचं बहिष्कार नाटक संपलं अन् IND vs PAK लढतीचा मार्ग मोकळा झाला. १५ फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारत-पाकिस्तान या दोघांनी अ गटात आपापले दोन सामने जिंकले आहेत आणि रविवारच्या लढतीतील विजेता सुपर ८ मधील आपली जागा पक्की करणार आहे. India vs Pakistan लढतीवरील सर्व सावट आता कुठे संपले असे वाटत असताना श्रीलंका सरकारने नव्या आव्हानाची चाहूल दिली. त्यामुळे हा सामना होईल की नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे.