Suryakumar Yadav explains the decision to pick Shubman Gill over Sanju Samson as opener
esakal
IND vs SA 1st T20I Suryakumar Yadav statement on Shubman Gill selection : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ खेळणार आहे. उद्यापासून सुरू होणारी India vs South Africa T20I मालिका ही वर्ल्ड कपच्या तयारीच्यादृष्टीने महत्त्वाची आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत भारताकडे फक्त १० ट्वेंटी-२० सामने आहेत आणि त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये आता प्रयोग न करण्याचा निर्धार सूर्यकुमारने बोलून दाखवला आहे. कटक येथे पहिला ट्वेंटी-२० सामना होणार आहे आणि त्यात शुभमन गिलकडे ( Shubman Gill) सलामीची जबाबदारी कायम असणार असल्याचे सूर्याने स्पष्ट केले. त्याचवेळी संजू सॅमसनला ( Sanju Samson) मधल्या फळीत खेळावे लागेल हे स्पष्ट झाले.