India lose the 2nd ODI despite posting 358 runs
esakal
India vs South Africa 2nd ODI Marathi Update : दक्षिण आफ्रिकेने रायपूर येथे ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने विजयासाठी ठेवलेले ३५९ धावांचे लक्ष्य त्यांनी चार विकेट्स व ४ चेंडू राखून सहज पार केले. वन डे क्रिकेटमधील हा त्यांचा परदेशातील सर्वात मोठा लक्ष्याचा पाठलाग ठरला. विराट कोहली व ऋतुराज गायकवाड यांच्या शतकांना आफ्रिकेच्या एडन मार्करमने ११० धावा करून उत्तर दिले. त्याला तेंबा बावुमा, मॅथ्यू ब्रित्झकी, डेवॉल्ड ब्रेव्हिस व कॉर्बिन बॉश यांची साथ मिळाली. आफ्रिकेने हा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. भारताच्या या पराभवाला पाच खेळाडूंचे अपयश कारणीभूतग ठरले.