KL Rahul seen scolding Prasidh Krishna during the 2nd ODI in Raipur
esakal
KL Rahul-Prasidh Krishna viral stump mic conversation: भारतीय संघाला रायपूर येथे दुसऱ्या वन डे सामन्यात धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या वन डेत ३५९ धावांच्या विक्रमी लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. दवामुळे भारतीय गोलंदाजांना गोलंदाजी करताना त्रास होणार हे निश्चित होते, त्यामुळेच टॉस जिंकून तेंबा बावुमाने लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजी दिशाहीन दिसली आणि ती पाहून कर्णधार लोकेश राहुलचा पारा चढला. विशेषतः त्याने प्रसिद्ध कृष्णाला चांगले धारेवर धरले.