Rohit Sharma closing in on 20,000 international runs milestone
esakal
Rohit Sharma Eyes Massive Milestone in 2nd ODI vs South Africa: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज रायपूर येथे दुसरा वन डे सामना होणार आहे. भारताने पहिली मॅच जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी पहिला सामना गाजवला. रोहितने अर्धशतकी खेळी करून विश्वविक्रमाला गवसणी घातली. आता त्याला आणखी एक विक्रम खुणावतोय. रोहितने आज ४१ धावा केल्यास तो मोठ्या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे.