Quinton de Kock hammered a brutal 90 against India in the IND vs SA 2nd T20I
esakal
Cricket
IND vs SA 2nd T20I: भारतीय गोलंदाजांचे वस्त्रहरण करणाऱ्या Quinton De Kock ने रचला इतिहास; नोंदवला जगात भारी विक्रम...
India vs South Africa 2nd T20I : भारतीय गोलंदाजांचे अक्षरशः धिंडवडे काढत क्विंटन डी कॉकने IND vs SA दुसऱ्या सामन्यात इतिहास रचला. केवळ ९० धावांची तुफानी खेळी खेळत त्याने भारताविरुद्ध T20I क्रिकेटमधील एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला.
Record-breaking milestones by Quinton de Kock against India: दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतावर ५१ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. क्विंटन डी कॉकच्या आक्रमक ९० धावांच्या खेळीने आफ्रिकेला ४ बाद २१३ धावांपर्यंत पोहोचवले. भारताचे सर्व प्रमुख गोलंदाज महागडे ठरले. प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण संघ १९.१ षटकांत १६२ धावांत तंबूत परतला. क्विंटनने ४६ चेडूंत ५ चौकार व ७ षटकारांसह ९० धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने भारताविरुद्ध मोठा पराक्रम केला.
