INDIA SUFFER HUMILIATING HOME DEFEAT AS SOUTH AFRICA WIN SERIES AFTER 25 YEARS
esakal
India vs South Africa 2nd Test Live in Marathi : भारतीय संघाला पुन्हा एकदा घरच्या प्रेक्षकांसमोर लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी पाकिस्तानात खेळून पूर्ण तयारीनिशी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीतही भारताला पराभूत केले. आफ्रिकेने ही मालिका २-० अशी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठा उलटफेर केला, तर भारताला मोठा धक्का बसला. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारताचा हा घऱच्या मैदनावरील कसोटी मालिकेतील दुसरी खराब कामगिरी ठरली. यापूर्वी न्यूझीलंडने त्यांना ३-० असे लोळवले होते.