Hardik Pandya Out, Girlfriend Mahieka Sharma’s Reaction Leaves Netizens Confused
esakal
Hardik Out, Mahieka’s Reaction Leaves Netizens Confused : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ च्या दक्षिण आफ्रिकेसमोर लोटांगण घातले. भारताचे स्टार फलंदाज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पुन्हा एकदा अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेच्या ७ बाद १८७ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताला पूर्ण २० षटकंही खेळता आली नाहीत. १८.५ षटकांत संपूर्ण संघ १११ धावांत तंबूत परतला आणि आफ्रिकेने ७६ धावांनी सामना जिंकला. ५ बाद ५१ अशी धावसंख्या असताना हार्दिक पांड्या मैदानावर आला आणि संघाच्या ८६ धावा झाल्यावर तो परतलाही. पण, तो बाद झाल्यानंतर गर्लफ्रेंड माहिका शर्माची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.