Why Axar Patel dropped from IND vs SA match
esakal
Washington Sundar picked over Axar Patel reason: भारतीय संघाची अपराजित मालिका रविवारी खंडित झाली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर ८ मधील पहिल्याच सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून दारूण पराभव पत्करावा लागला. १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा भारतीय संघ १११ धावांत तंबूत परतला. या पराभवाचा त्यांच्या नेट रन रेटवरही ( -३.८००) परिणाम झालाय आणि आता उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना वेस्ट इंडिज व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावे लागणार आहेत. पण, आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाने भारतीय संघाच्या रणनितीवर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित राहू लागले आहेत.