Will India change the winning XI in IND vs SA 2nd T20I?
esakal
Will India change the winning XI in IND vs SA 2nd T20I? भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा ट्वेंटी-२० सामना चंडिगढ येथे खेळवण्यात येणार आहे. येथील महाराज यधवींद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. एडन मार्करमचा आफ्रिकन संघ पहिल्या सामन्यात सपशेल अपयशी ठरला होता.