IND vs SL 1st Test: श्रीलंकेने डाव टाकला! १४ शतकं झळकावणाऱ्या खेळाडूची अचानक एन्ट्री; रेफरीने दिली परवानगी, नेमकी गडबड काय?

Big Twist in IND vs SL 1st Galle Test: पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने अचानक मोठा बदल केला आहे. भारतीय संघाने यजमानांसमोर मोठे आव्हान उभे केले असताना श्रीलंकेने तगड्या फलंदाजाला दुसऱ्या डावात मैदानावर उतरवले.
IND vs SL 1st Test

Pasindu Sooriyabandara replaces Dinesh Chandimal as concussion substitute

esakal

Updated on

Pasindu Sooriyabandara replaces Dinesh Chandimal: भारतीय संघाने पहिल्या कसोटीत श्रीलंकेसमोर ( IND vs SL ) ३७२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने दुसऱ्या डावात १९३ धावा केल्या आणि त्यात रिषभ पंतचे अर्धशतक महत्त्वाचे ठरले. गॉलच्या मैदानावर आतापर्यंत एकाही आंतरराष्ट्रीय संघाला चौथ्या डावात ३५० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही. त्यामुळेच श्रीलंकेसाठी या धावा आव्हानात्मक आहेत. पण, त्यांनी अचानक प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे आणि १४ शतकं नावावर असेलल्या फलंदाजाला अचानक खेळण्यास उतरवले आहे. सामनाधिकारीनेही याला परवानगी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com