IND vs SL 1st Test : बुमराहची अनुपस्थितीत, दोन गोलंदाजांपैकी निवडू कोणाला? शुभमन गिल पहिल्या सामन्यापूर्वी पेचात अडकला, म्हणाला...

Shubman Gill Press Conferance : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलसमोर प्लेइंग इलेव्हन निवडीचा मोठा पेच निर्माण झाला आहे
Shubman Gill Press Conferance

Shubman Gill Press Conferance

esakal

Updated on

IND vs SL 1st Test India probable playing XI without Jasprit Bumrah: भारत-श्रीलंका यांच्यातली पहिली कसोटी मॅच उद्यापासून सुरू होत आहे. भारताने मागील पाच कसोटी सामन्यांत श्रीलंकेविरुद्ध अपराजित मालिका कायम ठेवली आहे. पण, यावेळी मालिकेला सुरूवात होण्यापूर्वीच भारताला दुखापतीचा सामना करावा लागला आहे. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह व मधल्या फळीतील फलंदाज साई सुदर्शन यांनी दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आहे. जसप्रीतच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजवर जलदगती गोलंदाजीचे नेतृत्व असेल, पण त्याला साथ द्यायला दुसरा गोलंदाज कोण? सध्या हा पेच कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill) समोर उभा राहिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com