Yashasvi Jaiswal provokes Niroshan Dickwella before getting him out
esakal
Yashasvi Jaiswal provokes Niroshan Dickwella before getting him out: भारतीय संघाची विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. श्रीलंकेच्या संघाने पहिल्या कसोटीत शरणागती पत्करली आहे आणि पाचव्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत त्यांनी १७५ धावांवर ६ गडी गमावले आहेत. सोनम दिनुषा ( नाबाद ६५) हा एकमेव स्पेशालिस्ट फलंदाज मैदानावर उभा आहे आणि यजमानांना अजून १९७ धावांची गरज आहे. ४ बाद ४७ वरून श्रीलंकेने चांगली लढत दिली होती आणि भारतीय गोलंदाजांना रडवले होते. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी साम, दाम, दंड असे सर्व प्रयत्न केले आणि त्यांना यशही मिळाले. असाच एक प्रसंग यशस्वी जैस्वाल आणि निरोशन डिकवेला यांच्यात पाहायला मिळाला.