IND vs SL 1st Test: परदेशात फडकला तिरंगा, राष्ट्रगीताने भारावलं गॉलचं मैदान; शुभमन गिलसह टीम इंडियाचा VIDEO तुफान व्हायरल

Independence Day Special : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीपूर्वी गॉलमध्ये भारतीय संघाने तिरंगा फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन ८०वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. कर्णधार शुभमन गिलने ध्वजारोहण केले. बीसीसीआयने शेअर केलेला VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Independence Day Special

Independence Day Special

esakal

Updated on

Independence Day Special : ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय संघाने श्रीलंकेतील गॉल येथे एक विशेष देशभक्तीचा क्षण अनुभवला. भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली आहे.

कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाने पूर्ण आदराने तिरंगा फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्यदिन साजरा केला. याचा एक व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने तिरंगा फडकावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com