Shubman Gill hit on thumb during India practice
esakal
India training session before IND vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याआधी शुभमन गिलच्या ( Shubman Gill ) नेतृत्वाखालील संघ ७ ते ९ ऑगस्ट या कालावधीत सराव सामना खेळणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने दुखापतीमुळे माघार घेतली होती. वॉशिंग्टन सुंदर पूर्णपणे तंदुरूस्त नसल्यामुळे पहिल्या सामन्याला मुकणार आहे. साई सुदर्शन याच्याही तंदुरुस्तीबाबत अद्याप अपडेट्स आलेले नाहीत. अशातही भारतीय संघ कसून सराव करतोय आणि सराव सत्राच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार शुभमन गिलच्या अंगठ्याला चेंडू लागल्याने चाहत्यांची धाकधुक वाढली आहे.