IND vs SL 1st Test: लोकेश राहुलची पहिल्या कसोटीतून माघार? दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास विलंब; नेमकं काय घडलं?

KL Rahul fitness update ahead of Day 2 IND vs SL 1st Test : भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पावसामुळे विलंब झाला आहे.
KL Rahul fitness update ahead of Day 2 IND vs SL 1st Test

KL Rahul fitness update ahead of Day 2 IND vs SL 1st Test

esakal

Updated on

KL Rahul latest injury update India vs Sri Lanka 1st Test: देवदत्त पडिक्कलच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेवर वर्चस्व गाजवले. पण, गॉल येथील पहिल्या दिवसाच्या खेळात टीम इंडियाची धाकधुक वाढवणारी घटनाही घडली. सलामीवीर लोकेश राहुल याला प्रचंड वेदनेमुळे रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले. त्यानंतर पडिक्कलने मोर्चा सांभाळताना १३१ धावांच्या नाबाद खेळीसह संघाला २ बाद २८८ धावांपर्यंत पोहोचवले. पण, दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास अवघ्या काही मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना, केएल राहुल पुन्हा फलंदाजीला येईल का हा प्रश्न सतावतोय.. त्याबाबतचे महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com