IND vs SL 1st Test: जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत 'हा' गोलंदाज श्रीलंकेला रडवणार; मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा नव्हे, तर...

Jasprit Bumrah absence India Sri Lanka Test series: भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला असून, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे.
Parvez Maharoof praises Gurnoor Brar

Parvez Maharoof praises Gurnoor Brar

esakal

Updated on

India vs Sri Lanka first Test Gurnoor Brar news: कोलकाता, ता. ११ : भारत-श्रीलंका यांच्यामध्ये १५ ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दुखापतीमुळे या मालिकेमधून माघार घेतली आहे. यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत होत असलेल्या या मालिकेआधी भारतीय संघाला धक्का बसला आहे.

याच पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू परवेझ महारुफ याने गुरनूर ब्रारचे कौतुक करताना म्हटले की, जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत २६ वर्षीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार हा भारतासाठी ‘एक्स फॅक्टर’ ठरू शकतो. गुरनूर ब्रारकडे विशेष गुणवत्ता असून, तो या मालिकेत आकर्षण ठरु शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com