Prabath Jayasuriya reprimanded by ICC during India Sri Lanka second Test
esakal
Yashasvi Jaiswal Asitha Fernando Prabath Jayasuriya ICC controversy: यशस्वी जैस्वाल व असिथा फर्नांडो यांच्यातल्या वादानंतर आयसीसीने दोघांवर दंडात्मक कारवाई केली. आता आयसीसीने आणखी एका खेळाडूला ताकीद दिली आहे. भारत - श्रीलंका दुसऱ्या कसोटीत खेळणारा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्या याला अधिकृत ताकीद देण्यात आली. जयसूर्याने खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ICC आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन केल्याचे आढळले. हे कलम “आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रिकेटची उपकरणे किंवा कपडे, मैदानातील उपकरणे किंवा वस्तू आणि साधनांचा गैरवापर” करण्याशी संबंधित आहे.