Rishabh Pant bats with heavily strapped hand against Sri Lanka
esakal
Rishabh Pant bats with heavily strapped hand against Sri Lanka : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत मजबूत आघाडी घेतली आहे. देवदत्त पडिक्कलने सलग दुसऱ्या सामन्यात श्रीलंकन गोलंदाजांना समाचार घेतला आणि शतक झळकावले. पण, कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सर्वांचे लक्ष वेधले ते रिषभ पंतने… भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज काल दुखापतग्रस्त होऊन तंबूत परतला होता आणि तो आज फलंदाजीला येईल की नाही, याबाबत शंका होती. पण, सारांश जैनच्या विकेटनंतर रिषभ मैदानावर आला. हाताला पट्टी बांधलेल्या रिषभला पाहून श्रीलंकेच्या गोलंदाजांना धक्का बसला.