

IND vs SL, Who Are the ‘Kings of Galle’?
esakal
IND vs SL: काही क्रिकेटपटू असे असतात की, एखादं मैदान त्यांच्या नावावरच झाल्यासारखं वाटतं. त्या मैदानावर ते सातत्याने चांगली कामगिरी करतात आणि विरोधी संघाला अडचणीत आणतात. श्रीलंकेचे प्रभात जयसूर्या आणि रमेश मेंडिस यांचंही गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमशी असंच काहीसं नातं आहे.
गॉलच्या मैदानावर या दोन्ही फिरकीपटूंनी आतापर्यंत मिळून तब्बल १४५ विकेट्स घेतल्या आहेत. डावखुरा फिरकीपटू प्रभात जयसूर्याने केवळ ११ कसोटी सामन्यांमध्ये ८१ विकेट्स घेतल्या आहेत. तर ऑफ स्पिनर रमेश मेंडिसने १२ कसोटींमध्ये ६४ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.