IND vs SLC XI Warm-Up: जयस्वाल पंत शून्यावर आऊट, गंभीरची रणनीती फसली? पडिक्कलने लाज राखली; श्रीलंका इलेव्हनविरुद्ध ठोकले शतक

IND vs SLC XI Warm-Up: जयस्वाल, पंत आणि जुरेल स्वस्तात बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कलने 142 धावांची शानदार खेळी केली. जडेजा-सुथारने डाव सावरला, तर गुरनूर बरारने 4 षटकार ठोकत भारताला श्रीलंकेच्या 363 धावांच्या जवळ नेले.
IND vs SLC XI Warm-Up

IND vs SLC XI Warm-Up

esakal

Updated on

IND vs SLC XI Warm-Up Day 2: श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताचा तीन दिवसीय सराव सामना सुरू आहे. कोलंबोमध्ये भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यात हा सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी दमदार खेळ करत श्रीलंकेला चांगली टक्कर दिली.

दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ९० षटकांत ६ विकेट्स गमावत ३५७ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारत आता श्रीलंका क्रिकेट इलेव्हनच्या पहिल्या डावाच्या धावसंख्येपेक्षा फक्त ६ धावांनी मागे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com