Kuldeep Yadav four wicket haul against West Indies
India vs West Indies 1st ODI Marathi Scorecard : कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav) त्याची उपयुक्तता दाखवून देताना चार विकेट्स घेऊन त्याला वारंवार संघाबाहेर ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. वेस्ट इंडिजने सुरुवात दमदार केली होती, परंतु कुलदीपच्या फिरकीने सामन्याला कलाटणी दिली. सलामीवीर जस्टीन ग्रीव्ह्सच्या ( Justin Greaves Hundred ) शतकच्या आणि जॉन कॅम्बेलच्या अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी भारतासमोर सन्मानजनक आव्हान ठेवण्यात यश मिळवले.