

Shreyas Iyer - Ishan Kishan | India vs West Indies 1st T20I
Sakal
India vs West Indies 1st T20I : भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिकेतील लखनौला झालेल्या पहिल्या सामन्यात ८ विकेट्स आणि ३२ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आहे.
भारताच्या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) मोलाचा वाटा उचलला आहे. त्याने या सामन्यात वादळी शतक ठोकले आणि तो नाबादही राहिला. गोलंदाजी करताना पदार्पणवीर नमन धीरनेही (Naman Dhir) प्रभावी गोलंदाजी केली.
या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारताने १४.४ षटकात २ विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. या विजयासह ५ सामन्यांच्या या टी२० मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.